16.8 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त माता-पालक मेळावा; शिक्षणातून आदर्श समाजनिर्मितीचा संदेश: विद्यार्थ्यांकडून ‘जन्म दे ग आई’ नाटिकेचे प्रभावी सादरीकरण

 सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त माता-पालक मेळावा; शिक्षणातून आदर्श समाजनिर्मितीचा संदेश: विद्यार्थ्यांकडून ‘जन्म दे ग आई’ नाटिकेचे प्रभावी सादरीकरण

दि. 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेत माता-पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. श्रद्धाताई काकडे यांच्या पुढाकारातून आणि शाळेचे मुख्याध्यापक सांजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी त्र्यंबकजी पोले साहेब, शिक्षणविस्ताराधिकारी के. सी. घुगे सर व रत्नमाला शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबकजी पोले साहेब म्हणाले की, “आदर्श समाजनिर्मितीसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्यामध्ये महिलांची भूमिका मोठी असून त्यांनी मुलांना शिक्षणासोबत उत्तम मूल्ये द्यावीत.”कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी “जन्म दे ग आई” या सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी लाटे सर यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता मगर बाई व प्रा. संतोष काकडे सर यांनी केले. आभार प्रदर्शन कैलास पांडे सर, दिपाली ढोले ताई व शिवसांभ मुक्कनवार सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी बापूराव काकडे, पोलीस पाटील रेखाताई शेळके, मोतीराम शेळके, दत्तराव बुधवन्त, संतोष पालवे, विठ्ठल घनसावध, कैलास काकडे, ज्ञानेश्वर काकडे, माणिक इंगोले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केलेया माता-पालक मेळाव्यामुळे शिक्षणाचे महत्त्व, महिलांची भूमिका आणि मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची गरज याबाबत जागरूकता निर्माण झाली.

spot_img

Related Articles

जिंतूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडणार

जिंतूर (प्रतिनिधी): सागर पुंडगे  स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम राखत जिंतूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६...

काय तर म्हणे बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, तरीही केंद्र सरकार बांगलादेशला ५ हजार टन डिझेल देणार “हे कसले हिंदुत्व?” — सोशल मीडियावर सरकारवर जहरी टीका 

  नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी    जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!