दैनिक प्रजाशाहीचा आवाज
रविवार | १९ जुलै २०२६
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : आमदार राजूभैय्या नवघरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
वसमत | प्रतिनिधी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वसमत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी आज आपला लोकशाहीतील सर्वोच्च अधिकार असलेला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर त्यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरी हिताचे व्हावे, या विश्वासाने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविल्याचे सांगितले. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची निवड होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते. प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करावी,” असे आवाहन केले
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे





