22.3 C
New York
Tuesday, July 28, 2026

Buy now

spot_img

उड्डाणपूल की निधी उडवण्याची योजना? MMRDA वर गंभीर आरोप विकासाच्या नावाखाली 100 कोटींचा अपव्यय?

100 कोटींचा उड्डाणपूल की MMRDA चा उडता विनोद?

मीरा-भाईंदरमध्ये चारपदरी पूल अचानक दोनपदरी; ‘विकास’ की थेट निधीची लूट?

मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी

भोपाळमधील 90 अंश वळणाच्या पुलाने देशभरात हास्य आणि संताप निर्माण केल्यानंतर आता महाराष्ट्रातील मीरा-भाईंदरमध्ये MMRDA च्या ‘अद्भुत इंजिनीअरिंगचा’ नवा नमुना समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला दुमजली उड्डाणपूल चारपदरी असल्याचा गवगवा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात हा पूल अचानक दोनपदरी करण्यात आल्याने तब्बल 100 कोटी रुपयांवर पाणी फेरले गेले आहे.

हा विकास आहे की नियोजनाचा बोजवारा? असा थेट सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

आराखडा कुणासाठी? वापर कुणासाठी?

MMRDA ने मीरा-भाईंदरमध्ये तीन ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा दावा केला. वाहतूक कोंडी कमी होईल, वेळ वाचेल, शहर आधुनिक बनेल—अशा घोषणा करण्यात आल्या. पण प्रत्यक्षात एका पुलावर चार पदरी रस्ता थेट दोन पदरी होत असल्याचे चित्र समोर आले आणि संपूर्ण प्रकल्पच संशयाच्या भोवऱ्यात सापडला.

चार पदरी पूल बांधायचा, पण वापर दोन पदरीचा—हे कसले इंजिनीअरिंग? की आधी ठेकेदाराचे बिल फुगवायचे आणि नंतर नागरिकांनी तडजोड करायची?

100 कोटी कुणाच्या खिशात?

या पुलासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, कामे मंजूर झाली, देयके अदा झाली. मग प्रश्न असा आहे की,

चारपदरी पूल दोनपदरी का झाला?

जागेचा, वळणाचा, वाहतुकीचा अभ्यास आधी का केला नाही?

चूक माहिती असूनही काम सुरू का ठेवले?

जर ही चूक असेल तर ती गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे. आणि जर जाणूनबुजून केले असेल, तर हा थेट आर्थिक गैरव्यवहार नाही का?

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

सदर पुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून MMRDA च्या कार्यपद्धतीवर नागरिक अक्षरशः संताप व्यक्त करत आहेत.

“इंजिनीअरिंग कॉलेजची प्रोजेक्ट वाटते”,

“करदात्यांचे पैसे रस्त्यावर फेकले”,

“पूल आहे की बाटलीचं तोंड?”

अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जबाबदारी कुणाची? उत्तर देणार कोण?

या प्रकरणात एकाही अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होताना दिसत नाही. आराखडा मंजूर करणारे, तांत्रिक सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, ठेकेदार—सगळेच गप्प का आहेत?

MMRDA च्या नावाखाली सुरू असलेला हा ‘विकास’ प्रत्यक्षात अकार्यक्षमता, नियोजनशून्यता आणि संभाव्य भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

चौकशी नाही, तर हे सुरूच राहणार!

आज हा पूल, उद्या आणखी एखादा. चौकशी झाली नाही, दोषींवर कारवाई झाली नाही, तर मीरा-भाईंदरच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अशाच प्रकारे कोट्यवधींची उधळपट्टी सुरूच राहणार, हे निश्चित.

जनतेचे पैसे हे कोणाच्याही प्रयोगशाळेचे साहित्य नाहीत.

MMRDA ने तात्काळ खुलासा करावा, जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी—ही आता मागणी नव्हे, तर लोकांचा इशारा आहे.

spot_img

Related Articles

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देगलूर येथे २० जुलै रोजी शांततापूर्ण आंदोलन  

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देगलूर येथे २० जुलै रोजी शांततापूर्ण आंदोलन   देगलूर | प्रतिनिधी गौतम वाघमारे   प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक...

आमदार राजू नवघरे यांनी बजावला मताचा अधिकार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

दैनिक प्रजाशाहीचा आवाज रविवार | १९ जुलै २०२६   परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : आमदार राजूभैय्या नवघरे यांनी बजावला मतदानाचा हक्क   वसमत | प्रतिनिधी   परभणी जिल्हा मध्यवर्ती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!