
हिंगोली :- विशेष प्रतिनिधी
प्रकाश मगरे
कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली:
मौलाना अबुल कलाम आझाद आणि म्हैसूरचे शूर योद्धे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त कुरुंदा (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे ‘एकता महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष जनाब फारुख अहमद साहेब यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान होणार आहे.
‘अल्पसंख्याक समाज आणि त्यांचे राजकीय अस्तित्व’ या ज्वलंत विषयावर जनाब फारुख अहमद साहेब मार्गदर्शन करणार आहेत. अल्पसंख्याक समाजाचे देशाच्या राजकारणातील स्थान, त्यांचे हक्क आणि भविष्यातील राजकीय दिशा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते विचार व्यक्त करतील.
हा एकता महोत्सव दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कुरुंदा येथील हजरत टिपू सुलतान हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख वक्ते:
जनाब फारुख अहमद साहेब,
प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
विषय:अल्पसंख्याक समाज आणि त्यांचा राजकीय अस्तित्व
वेळ व स्थळ:
दिनांक: २२ नोव्हेंबर २०२५
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ: हजरत टिपू सुलतान हॉल, कुरुंदा,
ता. वसमत, जि. हिंगोली
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला समस्त कुरुंदा परिसरातील नागरिकांनी, विविध राजकीय-सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त युवा मंडळ कुरुंदा यांनी केले आहे.
आयोजक:
* समस्त युवा मंडळ कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली
विशेष सहकार्य: सलमान पठाण, सय्यद अयास, अलीम पठाण, अफसर राज, शेख समीर, शेख अरबाज, शेख आयान





