24.9 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img

ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या

आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन !!

ज्यांचे नाव घेता,अभिमानाने फुलते छाती I त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती,

ते नाव म्हणजेच,माता सावित्री क्रांतीज्योती II 

ज्या एका महान व्यक्तिमत्त्वाबद्दल जेवढे विशेषणे लावावीत ती कमीच आहेत, एक भारतीय महिला समाजसुधारक,स्त्री उधारक,पहिल्या महिला शिक्षिका,मुख्याध्यापिका ,शिक्षणतज्ज्ञ, भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्या, भारतीय स्त्रीवादाची जननी,बालविवाह विरोधक,पुनर्विवाह समर्थक,असामान्य कवयित्री म्हणजेच क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले होत.

 त्यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 रोजी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील आणि आई लक्ष्मीबाई होत्या.सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे कटगुणचे गोरे, परंतु ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले.स्त्री स्वातंत्र्याची साधी वाच्यताही होत नव्हती त्या परिस्थितीत सावित्रीबाईंनी आपले बालपण घालवले पुढे 1840 साली नऊ वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांचे लग्न 13 वर्षाचे ज्योतिबा यांच्या सोबत झाले.महात्मा फुले म्हणजे साक्षात ज्ञानाचा सूर्य, या दोघांच्या ज्योती-सावित्री,फुले दांपत्ये यांचा आपण उल्लेख असाच करतो. परंतु वैयक्तिकरित्याही सावित्रीबाई फुले यांनी फार महान कार्य केले आहे. तत्कालीन समाजाला दिशा दिली,समाजातील जुन्या रुढी प्रथा परंपरा विरुद्ध आवाज उठविला. त्याकाळी अस्पृश्यता,निरक्षरता, गरिबी, दारिद्र्य आणि वर्णभेद अशा एक ना अनेक समस्या होत्या. आज आपण त्यांची कल्पनाही करू शकत नाही धर्माच्या प्रस्थापितांकडून खालच्या वर्गावर,दिनदुबळ्या, स्त्रिया, अन्यायग्रस्त दलितांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता. या अन्यायामुळे जीव गेला तरी कोणाला फरक पडत नव्हता. कारण शिक्षण नसल्यामुळे अन्यायाची जाणीवच होत नव्हती तत्कालीन समाजात शिक्षणाचा अभाव, जातिभेद, स्त्रियांवरील अन्याय अत्याचार याविरुद्ध महात्मा फुले यांनी बंड पुकारले, या बंडासाठी सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना खंबीरपणे पाठिंबा दिला.

प्रथम सावित्रीबाई निरक्षर होत्या परंतु शिक्षणाची आवड आणि महात्मा फुल्यानी त्यांना पाटी घेऊन शिकन्याचे धडे दिले. त्या शिकल्या,वाचू लागल्या एवढा मोठा भक्कम आपल्या पतीचा आधार असल्यास घाबरण्याचे कारण नाही त्या लढण्यास सज्ज झाल्या.फुले आणि सावित्री शेतात लांब जाऊन आंब्याच्या झाडाखाली शिकण्यास सुरुवात करतात. सावित्रीबाईंना शिकविले. महात्मा फुले कडून शिक्षण घेत असताना सावित्रीबाईची जाणीव आणखीनच मजबूत झाली. या जाणिवेतूनच त्यांनी जातीभेदाला,वर्णभेदाला स्त्री-पुरुष असमानता यांना तीव्र विरोध केला. पुढे महात्मा फुले यांनी स्थापन केलेला ‘सत्यशोधक समाजाच्या’ त्या खंद्या समर्थक बनल्या. जेव्हा महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली तेव्हा त्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. इथून खरा संघर्ष सावित्रीआईचा सुरू होतो. शिक्षणासाठी मुलींना प्रवृत्त करणाऱ्या या महात्मा फुले यांच्या वडिलांनी महात्मा फुले व सावित्रीबाईना घराच्या बाहेर काढले होते. महात्मा फुले आणि सावित्रींना मूलबाळ होत नव्हतं त्यावेळी दुसरी पत्नी करावी म्हणूनही महात्मा फुले यांच्या वडिलांनी आग्रह धरला होता परंतु महात्मा फुले यांनी त्यावर योग्य ते उत्तर देत म्हणाले मूल न होण्यामागे फक्त स्त्रीच जबाबदार नसते तर पुरुषही जबाबदार असतो. एक स्त्री शिक्षिका म्हणून काम करत असताना निर्धावलेल्या धर्मपंडितांनी सावित्रीबाईंना फार त्रास,यातना दिल्या. अंगावर शेण फेकून मारणे, चिखल फेकणे, अर्वाचीत भाषेत शिव्या देणे, आणि धर्म बुडविला असे आरोप सुद्धा केले गेले. परंतु खूप यातना, त्रास सहन करूनही सावित्रीबाईंनी आपला प्रयत्न सोडला नाही त्या शाळेत शिकविण्यास जात होत्या तेव्हा सोबत एका पिशवीत अधिकची दुसरी साडी घेऊन जात आणि शाळेत ती भरलेली साडी बदलून तिला धुवून वाळवत, साडी बदलवत आणि शिकवत.

निश्चितच हा सावित्रीबाईचा प्रवास सोपा नव्हता ! त्याकाळी बालवयात स्त्रिया विधवा व्हायच्या, तेव्हा त्यांना केस कापून मुंडन करावे लागायचं,गर्भवती महिलांचे त्याहूनही अधिक हाल व्हायचे ! पुनर्विवाहास बंदी होती ह्या समस्या सावित्रीबाईंनी जवळून पाहिल्या होत्या किंबहुना सती प्रथा ही काही प्रमानत होती.तेव्हा त्यांना ह्या जाचक अमानुष्यप्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठविला,महात्मा फुल्यांनी एक ब्राह्मण महिला काशीबाईला आत्महत्येपासून वाचवले तिला घरी नेले त्यांनी सुरू केलेले ‘बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये’ तिची पूर्ण सोय केली गेली नंतर तिच्यापासून जन्मास आलेल्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव ठेवले “यशवंत” या गोष्टीला विशेष म्हणजे सावित्रीबाईंनी सहकार्य केले, दुजोरा दिला होता. एवढच नवे तर यशवंत यांचा अंतर्विवाह सावित्रीबीने लाऊन दिला आणि जातीय बंधने मोडीस काढली, पुढे यशवंतराव पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर झाले प्लेग महामारीच्या काळात त्यांनी जनसेवा केली,महिलांवरील अत्याचार थांबावेत. निराधार महिलांना आधार मिळावा सावित्रीबाईंनी ज्योतीरावांच्या साथीने स्थापन केलेले बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती आणि महिलांचा विकास हा त्यांनी आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मांडला होता. बाप, भाऊ, पती, आणि मुलगा यांच्या मदतीशिवाय स्त्री जगू शकत नाही मनुस्मृतीतील या विचारांचा त्यांनी पर्दाफाश केला होता. त्याकाळी एक महिला म्हणून हे कार्य करणे एवढं काही सोपं नव्हतं!

त्यांनी 1847 मध्ये चौथी परीक्षा पास केली आणि शिक्षिका बनल्या त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षक बनण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली होती.त्यांनी महिला आणि शोषित वर्गासाठी समानता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली.सावित्रीबाईंनी “गृहिणी” नावाच्या मासिकत काही लेख ही लिहीली आहेत. काव्याफुले, सावित्रीबाईंची गाणी,सुबोध रत्नाकर,बावनकशी,ज्योतीबांची भाषणे इत्यादी त्यांचे साहित्य उपलब्ध आहे.त्यांचे काव्य अगदी साध्या.सोप्या पण रसाळ भाषेत आहे.त्या म्हणतात.

ज्ञान नाही विद्या नाही , ते घेणेची गोडीही नाही I

बुद्धी असून चालत नाही,त्यास मानव म्हणावे का II

अश्या सध्या भाषेत सावित्रीबाईंचे साहित्य आजही बोलक साहित्य उपलब्ध आहे.

त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.त्यांनी ‘रामोशी समाचार’ या नियतकालिकातून दलितांच्या व्यथा मांडल्या.आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले.सावित्रीबाई फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता.त्या एक लेखिका देखील होत्या.

 पुढे 1851 साली पुण्यात रास्ता पेठ येथे दुसरी व 1852 साली बटालपीठ येथे तिसरी मुलींची शाळा सुरू केली.याच्यावरून फुले दांपत्याचे शिक्षणांप्रती त्या काळामध्ये किती मोठे योगदान आहे हे आपणास दिसून येते. इसवी सन 1876 आणि 1879 च्या दुष्काळात लोक भुकेने ग्रासलेले असताना भुकेल्यांच्या पोटी अन्न मिळावे म्हणून त्यांनी पुणे व इतर भागात अन्नछत्र चालविली.आश्रमात राहणाऱ्या मुलांची व्यवस्था केली 1890 ला महात्मा फुले यांचे निधन झालं, धर्मकंठकांनी यशवंतला,त्यांच्या पुत्राला फुल्यांच्या अंत्ययात्रेला विरोध केल्यानंतर, डोळ्यात दुःखांचे सावट भरलेल्या सावित्रीबाईंनी दत्तक पुत्र यशवंतरावाच्या मार्फत या महामानवाची अंत्ययात्रा पार पाडली.फुलेच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.त्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे यांनी सावित्रीबाई यांना खूप मदत केली परंतु काही दिवसांनी यांचेही निधन झाले.पुढे 1896-97 साली पुण्यात प्लेगची साथ आली,ह्या रोगाने थैमान घातले होते जसे आपण हा प्रसंग ‘कोरोना’ या महामारीत अनुभवला त्याप्रमाणे दिवसाला पुण्यात बरीचशी माणसे मरण पावत होती परिणामकारक औषधे उपलब्ध नसल्याने दहशत व भीती निर्माण झाली होती.लोकांना प्लेग म्हणजे एखाद्या देवीचा कोप झाला असं वाटत होतं कारण त्यावेळी अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली होती.त्यावेळी सुशिक्षित डॉक्टरांची संख्या पण कमी होती आजूबाजूला पडलेली प्रेतं,अतोनात झालेले नुकसान बघून सावित्रीबाई संबंध हळवळल्या, त्या गप्प बसल्या नाहीत. दत्तक पुत्र यशवंताच्या मदतीने त्यांनी प्लेग्ग्रस्त रुग्णांना मदत करण्याचे ठरविले. यशवंतानी पुणे भागात ‘ससाणे’ या ठिकाणी ओसाड माळरानावर झोपड्या बांधून व्यवसायाने डॉक्टर असलेल्या यशवंताने प्लेगच्या रुग्णाची सेवा करण्यास सुरुवात केली.पुण्यातल्या प्लेगची लागण झालेल्या रुग्णांना क्लिनिकला आणून उपचार दिल्या जात होते,सावित्रीबाई मुलींना,महिलांना सांगून प्लेगच्या रूगनाना उचलून आणून रुग्णाची सेवा करत होत्या.प्रस्थापित समाजाच्या लोकांना रुग्णवाहिका,घोडागाड्या दिल्या जात परंतु दलित,गरीब वस्त्यातील रुग्णाकडे फारसे कोणी लक्ष देत नसत किंबहुना त्यांची साधी विचारपूसही करत नसत.परंतु सावित्रीबाईंनी दलित गरीब लोकांना दवाखान्यात नेऊन उपचार दिले.अश्यापद्धतीने प्लेगच्या साथीने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करता करता माता सावित्री यांनी ‘पांडुरंग बाबाजी गायकवाड’ नामक 10 वर्षीय मुलाला प्लेग या महामारीच्या रोगाने फार ग्रस्त झालेला असल्याने त्याला आपल्या स्वतःच्या पाठीवर बांधून जवळपास आठ ते दहा किलोमीटर चालत चालत रस्ता पारत करत रुग्णालयाकडे घेऊन गेल्या त्याच्यावर योग्य ते उपचार केल्या गेले आणि सुदैवाने तो पांडुरंग वाचला.त्या मुलाला प्लेगचा संसर्ग हा जास्त प्रमाणात असल्याने माता सावित्रीस सुद्धा प्लेग ने ग्रासले आणि उपचार घेतच त्यांची प्राणज्योत 10 मार्च 1897 ला मावळली.जनजागृतीसाठी सुरू केलेल्या दिनबंधू वर्तमानपत्राने ही निधनाची बातमी वर्तमानपत्रात छापली होती.शेवटी सावित्रीबाई सारखीच प्लेगची लागण झालेली असल्याने 1905 ला आपल्या वडिलांची आज्ञा पाळत, रुग्णांची सेवा करत यशवंताचीही प्राणज्योत मावळली,त्यांचेही निधन झाले.

अखेर महात्मा फुले सारखंच आपल्या पतीसारखेच आयुष्य दीनदुबळ्या, स्त्रिया, गोरगरीब या समाजासाठी माता सावित्रीने आपले जीवन खर्ची घातले.आपल्या देशात विरांचा गौरव केल्या जातो परंतु समाजसुधारकांचा इतिहास म्हणावा तेवढा गौरविला जात नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.

सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात, आज आकाश्यात झेपावण्याचे बळ आहे I

तू केलेल्या ज्ञानाचे,कर्तुत्वाचेच हे फळ आहे. II

पण असे असले तरी त्या एक शूरवीरांगणा,आद्य शिक्षिका होत्या हे नाकारता येत नाही हे मान्यच करावे लागेल. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका यांचा 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन,महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे तसेच 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. आजपर्यंत सावित्रीबाई फुलेंवर बरेच साहित्य लिहिल्या गेले,संशोधन केल्या गेले, त्यांच्या नावाने सावित्रीबाई साहित्य संमेलन भरले जाते.पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ‘स्त्री अभ्यासकेंद्र’ चालवले जाते, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत.

असे आई सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाबद्दल अलौकिक योगदान आहे, म्हणूनच शिक्षित होऊन समाजाप्रती आपले कर्तव्य बजावणं हीच आई सावित्रीला जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल,आई सावित्रीच्या पदकमलावर शब्दफुले वाहतो,वंदन करतो ,थांबतो अशा ज्ञानज्योतीला,क्रांतीज्योतीला कोटी कोटी नमन !

 

 

spot_img

Related Articles

जिंतूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडणार

जिंतूर (प्रतिनिधी): सागर पुंडगे  स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम राखत जिंतूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६...

काय तर म्हणे बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, तरीही केंद्र सरकार बांगलादेशला ५ हजार टन डिझेल देणार “हे कसले हिंदुत्व?” — सोशल मीडियावर सरकारवर जहरी टीका 

  नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी    जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!