12.5 C
New York
Saturday, October 31, 2026

Buy now

spot_img

नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र: “सम-समान-सम्मान” च्या आधारावर आघाडीची घोषणा

 

नांदेड, 11 नोव्हेंबर 2025 

नांदेड विशेष प्रतिनिधी: 


नांदेड जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

या आघाडीचा पाया “सम-समान-सम्मान” या तत्त्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

 

आघाडी संदर्भातील जागावाटप व रणनीतीसंबंधी चर्चा मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमच्या माध्यमातून पार पडली. चर्चेनंतर ठरविण्यात आले की तुर्तास १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे लढणार असून, पुढील निवडणुकांसाठीही परस्पर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

 

पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्याचा विशेष उल्लेख करण्यात आला…

वंचित आघाडीने ठाम भूमिका मांडली की “२ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत, ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुण्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात.” ही मागणी शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट झाली असून, दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या भूमिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

अधिपरिचारिका सोनुताई राठोड यांच्या न्यायाच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारणार! १६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीसमोर उपोषणाचा इशारा;...

  अधिपरिचारिका सोनुताई राठोड यांच्या न्यायाच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारणार! १६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीसमोर उपोषणाचा इशारा; पुनर्नियुक्ती, थकीत...

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!