बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन साठी लाखोंचा जनसागर हिंगोलीत उसळला.
हिंगोली : बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यासाठी देशभरात महामोर्चे निघत आहेत. त्यासाठी २८ मार्च रोजी हिंगोलीत महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा तळपत्या उन्हात काढण्यात आला. या तळपत्या उन्हात हिंगोली शहरातील युगपुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, संविधान कॉर्नर, इंदिरा गांधी चौक ते बस स्टॅन्ड समोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला. यावेळी बिहार राज्याचे बौध्द्धगया मंदिर कायदा अधिनियम १९४९ तात्काळ रद्द करून महाबोध्दी महाविहार बौध्द भिक्खू आणि बौध्द अनुयायी यांच्या ताब्यात देण्यासह विविध मागण्याचे निवेदन हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बिहारचे राज्यपाल, युनेस्कोचे चेअरमन यांना देण्यात आले.हिंगोली बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होत आहे. त्यासाठी ठिकविकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत २८ मार्च रोजी महामोर्चा हिंगोली शहरातील युगपुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी तळपल्या कडक उन्हात हातामध्ये विविध प्रकारचे बॅनर, झेंडे यासह विविध म्हणी दाखवून थेट मोर्चा जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विश्वरत्न शांतीदुत महाकारुनी तथागत भगवान बुध्द, भारत भुचे वैभव आहेत. भारत नाही तर संपूर्ण जगाने भगवान बुध्दाच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे. जगाच्या पातळीवर रामता, न्याय, बंधुता ही बुध्दांची शिकवण रार्वश्रेष्ठ मानली गेली आहे. त्यामुळे बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे. परंतु त्यावर ब्राह्मण लोकांनी कब्जा केला आहे
जिल्हाधिकारी कार्यालयात हिंगोली येथे २८ मार्च शुक्रवार रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेहोते. हा मोर्चा शहरातील विविध मार्गानी जात जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी २ ते २.३० वाजता धडकला असता भिक्खू संधानी बुध्द्धगया येथील बोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याच्या व इतर मागण्यांची उदघोषणा केल्यानंतर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी भिक्खू संघ व इतर आंबेडकरी कार्यकर्ते गेले असता एकही अधिकारी-कर्मचारी या ठिकाणी दिसून न आल्याने एकप्रकारे दांडीच मारल्याची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र एका धावपळल आलेल्या नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
बिहार राज्याच्या बुध्दगया मंदिर कायदा अधिनियम १९४९ नुसार महाबोधी महाविहारावर बौध्द धर्मीय नसलेल्या इतर धर्मीयांनी अनैसर्गीक ठाण मांडलेले
आहे. त्यामुळे भगवान बुध्दाच्या तत्वज्ञानाचे या ठिकाणी अवहेलना आणि विटंबना सुरु आहे. सदर कायद्याने सध्या अस्तित्वात असलेल्या महाबोध्दी महाविहार ट्रस्टवर एकूण ९ सदस्य नियुक्त आहेत. ज्यामध्ये प्रत्येकी बौध्द धर्मीय ४ आणि हिंदू धर्मीय ४ सदस्य असून हिंदू धर्माचा असणारा जिल्हाधिकारी या समितीचा अध्यक्ष राहिल अशी या कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना भिक्खू संघ व बौध्द उपासक-उपासिका, सर्व आंबेडकरी, राजकीय, सामाजिक संघटना यांच्च्या वतीने देण्यात आले. दरम्यान महाबोध्दी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा हिंगोलीतून कडक उन्हात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आला. हा मोर्चा संविधान कॉर्नर, इंदिरा गांधी चौक, बरारथानका समोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष व लहान बालके यासह राजकीय पक्षातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिहार व केंद्र सरकारने याची दखल न घेतल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशाराही या महामोर्चातून देण्यात आला. यावेळी भन्ते पय्याबोध्दी थेरो, भन्ते धम्मदिप महाथेरो, भदंत बुध्दकिर्ती थेरो, भदंत मुदीतानंद थेरो, भदंत पय्यारत्न शेरो, भन्ते शिलरत्न शेरो, भन्ते बुध्दभुषण, भन्ते पय्यावर्धन, भंते सचितबोधी भन्ते चंद्रमुनी, भन्ते शालवंश, दिवाकर माने, मधुकर मांजरमकर, अनिल कांबळे, भन्ते पट्टीशन, सुमेत बोध्दी, बंडू नरवाडे, अक्षय नरवाडे, योगेश नरवाडे, प्रकाश इंगोले, अँड. दिपक मांजरमकर, रेखा सरोदे, इंजिनियर प्रविण कांबळे, वैभव धबडगे, रविंद्र वाढे, दिनेश हनुमंते, ज्योतीपाल रणवीर, संभाजी मोगले, दिलीप भिसे, अक्षय इंगोले, राजकुमार एंगडे, राहूल बोलके यांच्यासह हजारो उपासक-उपासिका व नागरीक सहभागी झाले होते.





