19.3 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img

धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द

धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द

जिल्हाधिकारी यांच्या पथकांची अचानक भेट देऊन कारवाई

हिंगोली , दि. २९ : जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्तभाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासिनता दूर करुन पात्र लाभार्थ्यांना विहीत वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच दिरंगाईखोर रास्तभाव दुकानदारांवर प्रशासनाचा वचक बसविण्याकरीता दिनांक २८ मार्च, २०२५ रोजी सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अत्यंत कमी धान्य वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानाला जिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक भेट देवून तपासणी केली. या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींमुळे तात्काळ प्रभावाने निळोबा पांडुरंग मुळे यांच्या नावे असलेला मौ. माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या पथकातील जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे, महसूल सहाय्यक पी.व्ही. काळबांडे तसेच ग्रा.म.अ. एन.जी.ढोले हे उपस्थित होतेतसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारच्या कुचकामी रास्तभाव दुकानदारांवर अचानक भेटी देवून कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!