19.3 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देगलूर येथे २० जुलै रोजी शांततापूर्ण आंदोलन  

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देगलूर येथे २० जुलै रोजी शांततापूर्ण आंदोलन

 

देगलूर | प्रतिनिधी गौतम वाघमारे

 

प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्या लोकहिताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता देगलूर येथे शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या आंदोलनात सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

आंदोलनाची सुरुवात महात्मा फुले नगर, दिगाव रोड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, देगलूर येथून होणार असून, शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आपली भूमिका मांडण्यात येणार आहे.

 

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी नसून, लोकशाही मूल्यांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जनहिताच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.

 

सोनम वांगचुक यांनी पर्यावरण संरक्षण, हिमालयीन प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचे जतन, स्थानिक नागरिकांचे हक्क आणि शाश्वत विकास या विषयांवर सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यांच्या या कार्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी नागरिकांकडून समर्थन व्यक्त केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देगलूर येथेही हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

 

आयोजकांनी सर्व सहभागी नागरिकांना शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा, भडकाऊ घोषणाबाजी किंवा अनुचित कृत्यांपासून दूर राहून लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

आंदोलनाची माहिती :

 

दिनांक : २० जुलै २०२६ (सोमवार)

 

वेळ : दुपारी १२.०० वाजता

 

मार्ग : महात्मा फुले नगर, दिगाव रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, देगलूर

 

स्वरूप : शांततापूर्ण लोकशाही आंदोलन

 

 

“आपली उपस्थिती हीच लोकशाहीची खरी ताकद असून, जनहिताच्या प्रश्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!