15.7 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img

मोर्चा प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या- युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे यांची मागणी

मोर्चा प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या-

युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे यांची मागणी

प्रतिनिधी जवळा बाजार: प्रमोद श्रीखंडे

औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांचा प्रतिकात्मक प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली होती या प्रकरणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तो गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन १३ जानेवारी रोजी युवासेना जिल्हा युवाअधिकारी चंद्रकांत शिंदे यांच्यासह पोलीस स्टेशन जवळा बाजार येथे देण्यात आले

औंढा नागनाथ येथे ८ जानेवारी रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्च्यात गाढवावर गटविकास अधिकारी यांची प्रतीकात्मक प्रतिमा ठेवत निषेध नोदविण्यात आला गटविकास अधिकारी जी यू कल्हारे यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी राजेश सवनेकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे हा मोर्चा लाभार्थ्यांनवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात काढला होता त्यामध्ये आर्थिक अन्याय अपमानास्पद वागणूक अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नव्हता शिवाय मोर्च्यामध्ये कुठल्याही हिंसक प्रकार झाला नाही शासनाच्या मालमत्तेचे नुकसान व्ययक्तिक बदनामी कायदा व सुव्यव्यवस्थेला बाधा आणल्या गेल्या नाही असे म्हणणे मांडत तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शिंदे शिवसेना सर्कलप्रमुख दत्तराव अंभोरे मार्केट कमेटी संचालक नवनाथ पाटील शहरप्रमुख बाळू पवार युवासेनेचे जगर्नाथ राखोंडे सुरेश अंभोरे दत्ता शिंदे धीरज शिंदे निखिल शेळके आकाश अंभोरे मुंजा आहेर बाळू राखोंडे सोनू राऊत शिवम साखरे रोहित अंभोरे प्रसाद मांडे गजानन वाजे तानाजी गाढवे बाळू टारफे उपस्थित होते

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!