आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारची भाऊ गर्दी..
दैनिक प्रजाशाहीचा आवाज.
किनवट…जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तालुका किनवट येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने प्रचंड प्रतिसादात पार पडल्या.यावेळी किनवट तालुक्यातील सर्व इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या व अर्ज दिले.अत्यंत चैतन्यपूर्ण,उत्साही वातावरणात मुलाखती झाल्या.यावेळी उमेदवारांच्या स्थानिक कामकाजातील अनुभव,सामाजिक सहभाग आणि जनसंपर्काच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.यावेळी मुलाखतींमधून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसोबतच स्थानिक विकासासाठी कटिबद्ध आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल असे तालुका अध्यक्ष निखिल भाऊ वाघमारे याच्याकडून इच्छुक उमेदवाराना सांगण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी अत्यंत ताकदीने मैदान गाजवेल याचा पूर्ण विश्वास तालुका कमिटीने व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडी तालुका किनवट अध्यक्ष निखिल भाऊ वाघमारे,उपाध्यक्ष दिनेश कांबळे,दूधराम राठोड,प्रवीण गायकवाड,अर्जून चव्हाण,सुरेश मुनेश्वर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






