प्रजाशाहीचा आवाज : विशेष प्रतिनिधी
हिंगोली: हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र आणि आपल्या कार्यशैलीने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे रेडगाव सोसायटीचे चेअरमन तथा काही सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. शिवाजीराव सवंडकर यांना संविधान दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांचे जनकल्याणकारी काम, विशेषतः जलव्यवस्थापन आणि स्वच्छता क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा सन्मान होत आहे. हा केवळ रेडगाव आणि हिंगोली जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
कार्याची ‘वेगळी पद्धत’ आणि ‘जलस्वराज्य’
शिवाजीराव सवंडकर यांची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्यांनी आपल्या तालुक्यातील सर्वात पहिले ‘रेडगाव’ हे गाव हागणदारीमुक्त केले. याशिवाय, गावात पाण्याची सोय नसल्याने गोरगरिबांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढत त्यांनी २००५ ते २००७ या काळात ‘जलस्वराज्य प्रकल्प योजने’ अंतर्गत गावाला पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली. ही योजना प्रभावीपणे राबवून त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पाण्याचा नळ नेला, ज्यामुळे माय माऊलीच्या कमरावरची घागर उतरली, अशी भावना गावकरी व्यक्त करतात.
दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
त्यांच्या याच भरीव कामाची दखल घेऊन, भारत सरकारच्या वतीने संविधान दिनानिमित्त त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कार समारंभ:
ठिकाण: महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५
पुरस्कार:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नॅशनल अवार्ड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण अवार्ड फॉर सोशल वर्क
हा सन्मान भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री, माननीय आदरणीय श्री रामदासजी आठवले साहेब (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
गाव-खेड्यातून कौतुकाचा वर्षाव
श्री. सवंडकर यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले जात असल्याने, गाव-खेड्यातून तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुरस्काराच्या घोषणेनंतर, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रुखमाजी हनवते, नारायण हनवते, सतीश हनवते आणि इतर मान्यवर मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.






