-2.2 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

spot_img

बार्टीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमादवारे साताऱ्यात साजरा केला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन!

 

 प्रजाशाहीचा आवाज  विशेष प्रतिनिधी: सातारा 

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी शाळा प्रवेश दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी मुख्यालय व साताऱ्याच्या प्रतापसिंह भोसले शाळेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अभिवादन केले. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनासंबंधात सर्व दस्तऐवज एकत्रित करून एक संशोधन प्रकल्प राबवण्याचा मानस बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी व्यक्त केला आहे. सोबतच लंडन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाच्या धर्तीवर डॉ. ‘आंबेडकर रूम ‘शासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा संकल्प व्यक्त केला. बार्टी संस्थेच्या मध्यमतुन विद्यार्थी दिन संपूर्ण राज्यामध्ये समतादुत विभागाच्यावतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 

 

त्याचाच भाग म्हणून बार्टी मुख्यालयात व राज्यभर कार्यक्रम घेण्यात आले बार्टीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला महासंचालक सुनील वारे,यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सांगली अध्यक्ष श्रीमती सरिता नरके, बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख अनिल कारंडे, मारुती बोरकर, वृषाली शिंदे नितीन चव्हाण व बार्टीतील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली खांडेकर व आभार प्रकल्प व्यवथापक सुमेध थोरात यांनी मानले.  

 

सातारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून छत्रपती प्रताप सिंह हायस्कूल जुना राजवाडा, सातारा येथे साजरा करण्यात आला. 

 

याप्रसंगी साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले, परिविक्षाधीन मुख्याधिकारी प्रज्ञाशील वाघमारे, महिला व बालविकास अधिकार ठोंबरे, शिक्षणाधिकारी आणि नायकवडी, शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, बार्टीचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड, छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल साताऱ्याचे मुख्याध्यापक देशमाने, पत्रकार अरुण जावळे, बार्टीचे रामदास लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. 

 

बार्टीच्यावतीने सवलतीच्या दरात डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ, पुस्तके बुक स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आली होती .भीम अनुयायी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा खरेदी करून महामानवास अभिवादन केले. विद्यार्थी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी समता रॅली द्वारे संविधानाच्या सामाजिक समतेच्या मूल्यांचा नाम फलकाद्वारे संदेश दिला. 

 

या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक सहभागी झाले होते. तसेच “कविता बाबासाहेबांच्या” या प्रबोधनात्मक काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रा. रमणी बबीता आकाश, नितीन चंदनशिवे ,प्रा. सुमित गुणवंत, बबन सरोदे, रमेश बुरबुरे, संदेश शालिनी संभाजी कर्डक, गजानन गावंडे, सुदेश जगताप, आकाश आप्पा सोनवणे यांनी सहभाग या नामवंत कवींनी यात सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रबोधनात्मक व काव्यातून वंदन केले. 

 

याप्रसंगी संपूर्ण राज्यातून आलेल्या अनुयायांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून बार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थी दिन यशस्वी होण्यासाठी समतादुत विभागाचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!