2.6 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

मातोश्री नगर येथे नागरी संवाद मेळावा आणि विकासकामांचे भव्य उद्घाटन

 

२५ लाखांच्या निधीतून विविध विकासकामांना प्रारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 परभणी: विशेष प्रतिनिधी

परभणी, (प्रतिनिधी) : परभणी शहरातील मातोश्री नगर येथे प्रभाग क्रमांक १५ च्या वतीने आयोजित नागरी संवाद मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते मा. आ. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर, मा. आ. श्री. सुरेशराव वरपूडकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमोद वाकोडकर, प्रशांत सांगळे, डॉ. केदार खटिंग, मोकिंद खिल्लारे, रितेश जैन, मंगलताई मुदगलकर, ठाकूर बुवा महाराज, दिलीप गिराम, अंकुशराव आवरगंड, अभिषेक वाकोडकर, अद्वैत पार्डीकर यांच्यासह प्रभागातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या प्रसंगी २५ लाख रुपयांच्या निधीतून नाली बांधकामासह प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

नागरी संवाद मेळाव्यात नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर लोकप्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा करत तात्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची ग्वाही दिली. “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,” असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक १५ अधिक सुबक, स्वच्छ व सुसज्ज करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!