अंजनवाडा मार्गे नंदगाव जाणारी नियमित बंद करण्यात आलेली बसफेरी तात्काळ सुरू करा; विद्यार्थ्यांना घेऊन औंढा बसस्थानकासमोर रास्तारोको आंदोलनाचा इशारा
औंढा नागनाथ प्रतिनिधी
औंढा बसस्थानकातुन अंजनवाडा मार्गे नंदगाव जाणारी नियमित बसफेरी काही दिवसांपूर्वी बंद केली होती आज विद्यार्थ्यांनी अंजनवाडा गावचे सरपंच किरण घोंगडे यांच्या कानावर घातले घोंगडे यांची देखील तात्काळ औंढा नागनाथ बसस्थानक गाठत गावातील विद्यार्थी व ग्रामस्थाची विचारपूस करुन ति बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थासह -विद्यार्थ्यांनी परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षात श्री.बांगर यांना निवेदन देण्यात आले.बंद केलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नियमित बसफेरी तात्काळ सुरू करावी अन्यथा औंढा नागनाथ बसस्थानकासमोर सरपंच किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलनाचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी निवेदनात दिला.

अंजनवाडा मार्गे नंदगाव जाणारी नियमित बंद करण्यात आलेली बसफेरी तात्काळ सुरू करा; विद्यार्थ्यांना घेऊन औंढा बसस्थानकासमोर रास्तारोको आंदोलनाचा इशारा