वसमत प्रतिनिधी :- संदीप इंगोले
वसमत तालुक्यातील सोमठाणा नगरीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मज भीमराव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सोमठाणा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे सर्व विद्यार्थ्यांना लहुजी मित्र मंडळ यांच्या वतीने शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढवण्याचे काम केलं आहे.जिल्हा परिषद शाळा आदरणीय मुख्याध्यापक श्री केंद्र सर श्री जोगदंड सर श्री राऊत सर श्री रुमणे सर श्री गजलवार सर श्री कलगुंडे सर श्रीमती आल्लापुरी ताई जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष गोपाळराव ढगे,सोमठाणा गावचे सरपंच स्वातीताई संजय जगताप,उपसरपंच विशालराव कदम, चेअरमन संजय जगताप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम कदम, माजी सरपंच रमेशराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य मदन जगताप, हर्षवर्धन पाटील, फुलाजी कदम, अंबादास कदम, सुदाम गायकवाड,सचिन गायकवाड, मारोती गाढे,उत्तम भंडारे , शुभम गाढे, संतोष गायकवाड, बंडू गाढे,दीपक गायकवाड,अनिल गायकवाड, गावातील लहान थोर व ग्रामपंचायत कर्मचारी सर्व उपस्थित होते. अशाप्रकारे हर्ष उल्हासाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 105 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.





