आज दिनांक 28 रोजी लोहा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांना डोलारा ग्रामपंचायत येथे नागरिकांनी निवेदन दिले सरपंच शामगिरी ग्रामसेवक मधुकर मोरे ग्रामपंचायत सेवक नारायण गिरी यांनी गावातील सामान्य जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देतो रमाई आवास योजनेतील घर देतो म्हणून प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपये घेतलेले आहेत आणि रोजगार सेवक संजय गणपती वाघमारे यांनी देखील गावातील नागरिकांना वेगवेगळ्या योजना देतो म्हणून प्रत्येक योजनेसाठी त्याचा भाव ठरलेला आहे त्याने शेततळ्याच्या दहा हजार विहिरीसाठी 25000 असे जवळपास गावातील 70 टक्के लोकांकडून त्यांनी पैसे उकळण्याचे काम केले आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व तेथील पदाधिकारी यांना त्रस्त होऊन आज गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आणि रोजगार सेवक संजय गणपती वाघमारे ग्रामसेवक मधुकर मोरे व ग्रामपंचायत सेवक नारायण गिरी यांच्या हकालपट्टी करा अशी निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली असता यावेळी निवेदनावर सह्या करणारे प्रकाश तारू, मिथुन वाघमारे,दिगंबर जोगदळे, संदीप बेटकर, मारुती पवळे इत्यादी उपस्थित होते





