दांडेगाव/30 जुलै
जवळा पांचाळ सर्कल प्रतिनिधी:रवी हनमंते
शेती म्हणजे प्रयोगशाळा समजली जाते, शेतकरी नेहमीच नविन पिकांचे प्रयोग करून पाहत असतात. कधी ते प्रयोग यशस्वी होतात तर कधी त्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. असेच एक कळमनुरी तालुक्यातील दांडेगावचे शेतकरी दिनेश हनुमंते हे अल्पभूधारक शेतकरी नेहमीच आपल्या शेतात नवीन प्रयोग करून पाहतात. त्यांनी आपल्या शेतात जांभूळ, सिताफळ, बोर, चेरी, पेरु, संत्रा, नारळ, फणस, आंबा इत्यादी फळझाडांची एक-दोन एक-दोन रोपं लावली आहेत. यासोबतच त्यांनी स्टार फ्रुट चु एक दोन रोपं एक वर्षापूर्वी लावली होती. आज त्याला सुंदर, टवटवीत व रसदार स्टार फ्रुट ची फळ लागले आहेत.
स्टार फ्रुट हे फळ खाल्याने पचनक्रिया सुधारते:स्टार फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतड्यांच्या कार्याला मदत करते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते:व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला संक्रमणांशी लढण्यास मदत करते. वजन कमी करण्यास मदत करते:कमी कॅलरीज आणि उच्च फायबर सामग्रीमुळे, ते वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
हृदयविकारांचा धोका कमी करते:फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. त्वचेसाठी चांगले:व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.
शरीर थंड ठेवते:स्टार फ्रुटमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला थंड ठेवण्यास मदत करते, विशेषतः गरम हवामानात. हाडे मजबूत करते:कॅल्शियम आणि इतर खनिजे असल्याने, ते हाडे मजबूत करण्यास मदत करते.
या स्टार फ्रुट चे झाड पाहण्यासाठी व फळाची चव चाखायला परिसरातील शेतकरी उत्सुकतेने येत आहे. नवीन फळ झाडं पाहून शेतकऱ्यांना नवल वाटत आहे.






दांडेगाव/30 जुलै