शहीद सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांनी
घेतली ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट
!
सुर्यवंशी यांच्या हत्येचा तपास
योग्य होत नसल्याची तक्रार
परभणी : परभणी प्रकरणात शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आज यशवंत भवन, अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या तपास प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार सूर्यवंशी कुटुंबियांनी केली.
यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून केसच्या तपासाची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी, मावशी तेजश्री दिगंबर विटकर, मावसा दिगंबर यलप्पा विटकर आदी उपस्थित होते





