2.8 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

spot_img

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

कुरुंदवाडी | प्रतिनिधी : संदीप इंगोले

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडी येथे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा उत्साहात पार पडला. या अभ्यास दौऱ्यासाठी पंजाब राज्यातून ९० महिला व १० पुरुष असे एकूण १०० सदस्यांचे पथक कुरुंदवाडी नगरीत दाखल झाले.

या प्रसंगी ग्रामपंचायत कुरुंदवाडीचे सरपंच श्री. सतीश फोले, उपसरपंच श्री. दत्तराव शेंडेराव, ग्रामविकास अधिकारी श्री. सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संभाजीराव मोळवणे, पो.पा. श्री. गवळी, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच श्री. केशवराव देलमाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. कोंडबा शेंडेराव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. यातमवाड, शिक्षक श्री. मदेवाड सर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका सौ. भारतीताई मोळवणे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सदस्य, गावातील तरुण मंडळी तसेच इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभ्यास दौऱ्यासाठी विस्तार अधिकारी श्री. कदम साहेब यांची माहितीगार व संपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. तोटेवाड साहेब यांचीही उपस्थिती लाभली.

राज्यात जाहीर असलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुःखवट्यामुळे या अभ्यास दौऱ्यानिमित्त औपचारिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला नाही. मात्र, गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शाळेतील मुलींनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत हात जोडून पाहुण्यांचे स्वागत केले, हे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून गेले.

यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार साहेब यांना उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली. पंजाबमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर विस्तार अधिकारी श्री. कदम साहेब यांनी कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण व आदर्श विकास कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. गावाच्या मुख्य कमानीतून प्रवेश करताच रस्त्यांच्या दुतर्फा झाडांनी आच्छादलेली हिरवळ, फ्लेव्हर ब्लॉकचे स्वच्छ रस्ते, अंडरग्राउंड नाल्या व लाईट फिटिंग, एक व्यक्ती–एक झाड उपक्रम, शाळेला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, तसेच सौरऊर्जा प्रकल्पामुळे शाळा व मंदिराला २४ तास मोफत वीजपुरवठा याची माहिती देण्यात आली.

गावात नळ मीटर बसविण्यात आले असून १०० टक्के करभरणा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच समशानभूमीत उभारलेला ‘स्वस्तिक प्लांट’ उपक्रम विशेष आकर्षण ठरला. या ठिकाणी १२०० झाडांची लागवड करण्यात आली असून भविष्यात येथे सुंदर उद्यान उभारून वयोवृद्धांसाठी विसावा, तसेच छोटे-मोठे सामाजिक कार्यक्रम घेण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर आलेल्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थ, महिला व पदाधिकाऱ्यांनी गावातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण भारतीय बैठकीत बसून वाढण्यात आले. विशेष बाब म्हणजे महिलांनीच पाहुण्यांना जेवण वाढले. पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेत ग्रामस्थांशी संवाद साधला, तसेच विद्यार्थ्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला.

या अभ्यास दौऱ्यामुळे कुरुंदवाडी ग्रामपंचायतीच्या आदर्श व नियोजनबद्ध विकासाचे सर्वत्र कौतुक होत असून, हा दौरा दोन्ही राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

spot_img

Related Articles

उड्डाणपूल की निधी उडवण्याची योजना? MMRDA वर गंभीर आरोप विकासाच्या नावाखाली 100 कोटींचा अपव्यय?

100 कोटींचा उड्डाणपूल की MMRDA चा उडता विनोद? मीरा-भाईंदरमध्ये चारपदरी पूल अचानक दोनपदरी; ‘विकास’ की थेट निधीची लूट? मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी भोपाळमधील 90 अंश वळणाच्या पुलाने...

औंढ्यात वंचित बहुजन आघाडीची वज्रमुठ; ९ गट आणि १८ गणांत शड्डू ठोकणार!

जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांचे कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे शाखा’ उभारण्याचे आवाहन औंढा नागनाथ: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच कंबर कसली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!