प्रजाशाहीचा आवाज विशेष प्रतिनिधी: परभणी
तरोडा (परभणी): परभणी तालुक्यातील मौजे तरोडा येथे सोमवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर आपला भर राहील, असे प्रतिपादन आमदार विटेकर यांनी यावेळी केले.
प्रमुख विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते अनेक महत्त्वाकांक्षी विकास कामांना सुरुवात करण्यात आली. या कामांमध्ये प्रामुख्याने रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे:किशोर विश्वनाथराव खवले यांच्या शेतापासून ब्रम्हपुरीकडे जाणाऱ्या १ किमी रस्त्याचे मजबूतीकरण.
मौजे ब्रम्हपुरी ते तरोडा १ किमी रस्त्याचे मातीकाम व मजबूतीकरण.
जगन्नाथराव शेळके यांच्या शेतापासून मुंजाजी शामराव शेळके यांच्या शेतापर्यंत १ किमी रस्त्याचे मजबूतीकरण.
मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम.
नवीन अबादी तरोडा गावठाण डीपीचे (वीज वितरण केंद्र) भूमिपूजन.
मूलभूत सुविधांच्या सुधारणेवर भर: आ. विटेकर
यावेळी बोलताना आमदार विटेकर यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. “नागरिकांच्या जीवनाशी निगडीत रस्ते, संरक्षण भिंती, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,” असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातूनच गावांचा विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रगतशील शेतकरी एकनाथरावजी साळवे होते. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन तुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, आमदार विटेकर यांचे सहकारी, युवक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विकास कामांमुळे तरोडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.






