चंद्रपूर विशेष प्रतिनिधी
केंद्रात व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप शा
सीत सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. बेरोजगारी, महागाईने कळस गाठला असून काँग्रेस पक्षाकडे नागरिकांचा कल वाढला आहे.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन मी केलेल्या विकासावर विश्वास दाखवत ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा, मुडझा, वांद्रा, कोसंबी, बल्लारपुर, चिचगाव, आक्सापुर, बरडकीन्ही तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, तालुका काँग्रेस सरचिटणीस गुरुदेव वाघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे यांसह अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष शामभाऊ उईके, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष विकास प्रधान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विधानसभा सरचिटणीस हंसराज लांडगे, शिवसेना तालुका सचिव लूनकरण चौधरी, राधेश्यामजी पत्रे, साजन मेश्राम, सहदेव पुराम आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथील माजी सरपंच महादेव मडावी, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष रामदास कोरटे, नितीन गेडाम, गुरूदेव पाल, मारोती मडावी, सोमेश्वर रडके, कृपाल चाफले, हळदा येथील शंकर राऊत, लोमेश राऊत, लक्ष्मण इटनकर, देवा भोयर, नेताजी राऊत, प्रमोद इटनकर, संदीप आवारी, रेवनाथ राऊत, सचिन रामटेके, महेश भोयर,नितीन रोहणकर, वैभव राऊत, राहुल भोयर, गोलू खोकले, कोसंबी येथील बुलंद ऊईके, इंजी निखील बुध्दे, बल्लारपूर येथील सिताराम मोहुर्ले, गणेश वाघरे, रमेश मोहुर्ले, अभिषेक वाढणकर, नरहरी कोटगले, मुखरू भोयर, वैभव जेंगठे, कैलास मोहुर्ले, श्रीहरी भोयर, होमराज मोहुर्ले, यादव मोहुर्ले, दिलीप मुनघाटे, नामदेव कस्तुरे, अधिर राऊत, गणेश उरकुडे, रामभाऊ महामंडरे, समीर सहारे, वैभव राऊत, लंकेश तोमटी, तुषार कावळे, यादव मेश्राम, रंजीत बुरूबांदे, सोनू हुलके, चेतन रोहणकर, गणेश कोल्हे, निखील खेकडे, पंकज उंदीरवाडे, मंगेश नवघडे, नकुल किनेकार, हेमंत धानोरकर, राहुल जूनघरे, आयुष नवघडे, भिमराव टेंभुर्णे, अक्षय जूनघरे, सोनू नैताम, मोनू नैताम, अंकुश सहारे, सोनू गेडेकार, जयगुरू टेंभुर्णे, वसंत नैताम, जानवा खेकडे, वासुदेव मेश्राम, सुधाकर कोल्हे, देवाजी कोल्हे, यशवंत भोयर, विलास डोमळे, चिचगाव येथील मच्छिंद्र देवढगले, रामकृष्ण खरकाटे, श्रीकृष्ण ढोरे, कन्हैया कोरडे, हिरामण मेश्राम, सुखदेव अलोने, आक्सापुर येथील वीनायक शेंडे, गुलाब भोयर, श्रीहरी भोयर, अर्जून मेश्राम, जालिंदर कोसरे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे






