2.6 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

झिरोफाटा येथून रुग्णांसाठी मोफत बस सेवा सुरु

परभणी: विशेष प्रतिनिधी प्रजाशाहीचा आवाज 

परभणी (प्रतिनिधी): परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.07) करण्यात आला.

यावेळी शिवानंद अमृत भारती महाराज,संतोष मासोरे, शिवाजीराव काळे, गजानन शिवाजी काळे, ओम नारायणराव काळे,व्यंकटेश काळे,दत्तात्रय काळे,माणिक भालेराव,लक्ष्मण तात्या भालेराव,अविनाश भालेराव,हनुमान भालेराव, हरीभाऊ कुटे,गणेशराव कदम,राजू सरपंच,राजू सुभाषराव काळे, रमेशराव धस, रवी खुळे, पांडुरंग खुळे, संतोष मोरे, गोविंद मोरे, बापूराव धस, सुभानराव धस, कुंडलिकराव खुळे,वैजनाथराव आहेर, बाबासाहेब आहेर, विलासराव जाधव, एकनाथ जाधव, सुरेश चट्टे, गंगा गाडगे, बबनराव गाढवे, बाळासाहेब डुकरे, नागेश देशमुख, ज्ञानेश्वर गिरी,संदीप झाडे, गोपीनाथराव झाडे, दादाराव चोपडे, बबनराव झाडे, माधवराव भरोसे, भास्कर भरोसे, बापूराव जावळे, मुंजाजी जावळे, रामा भरोसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले, झिरोफाटा बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत आर.पी. हॉस्पिटल येथे जाण्यासाठी दोन बसची व्यवस्था करण्यात आली आहे.या सेवेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्रवास सुलभ होणार आहे.असे डॉ.पाटील म्हणाले.

मोफत बस सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचा उपचाराचा प्रवास सुखकर होईल. तसेच, मोफत तपासणी आणि परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांमुळे प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळतील. असे याप्रसंगी सांगितले.

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!