2.2 C
New York
Sunday, December 21, 2025

Buy now

spot_img

व्हाईस ऑफ मीडिया पाठीशी असेल तर विद्यार्थी गगणभरारी घेतील: पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे प्रतिपादन

परभणी; विशेष प्रतिनिधी प्रमोद राऊत

परभणी,(प्रतिनिधी): विधायक कामामुळे व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना जगभरात पोहोचली असून ही संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभी असेल तर हे विद्यार्थी भविष्यात नक्कीच गगणभरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शैक्षणिक किट वाटप समारंभ प्रसंगी व्यक्त केला.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप समारंभाचे आयोजन रविवारी (दि.नऊ) रोजी धर्मापुरी ता.परभणी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के हे उपस्थित होते. व्यासपीठावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु ,व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मराठवाडा कार्यकारणी उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख,परभणी तालुकाध्यक्ष संतोष मगर,शहराध्यक्ष दिवाकर माने उपस्थित होते.

पुढे बोलतांना पोलीस अधीक्षक म्हणाले, महाराष्ट्रात स्थापन झालेल्या या संघटनेचे जाळे जगभर पसरले आहे, आरोग्य शिक्षण,गृहनिर्माण,व्यावसायिक दृष्टीकोन,नवतंत्रज्ञान या क्षेत्रात या संघटनेने भरीव काम सुरू केले आहे.विधायक कामामुळे ही संघटना आता नावारुपास आली असून व्हॉईस ऑफ मीडिया सारखी संघटना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्यास हे विद्यार्थी गगनभरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास पोलीस अधिक्षकांनी व्यक्त करीत व्हाईस ऑफ मिडीयाने हाती घेतलेल्या शैक्षणीक कार्याचे तोंडभरुन कौतुक केले.

यावेळी बोलताना प्रा.किरण सोनटक्के म्हणाले, सध्या सर्वत्र पालकांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनाची चिंता लागली आहे. मोबाईलचे व्यसन हे किती घातक आहे हे त्यांनी सांगत विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे असे आवाहन केले. ग्रामीण भागात राहूनही चांगले शिक्षण घेता येते, ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कोणत्या क्षेत्रात मागे राहीले नाहीत, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करावा आणि आपले ध्येय निश्चित करावे असे आवाहन प्रा.किरण सोनटक्के यांनी केले.यावेळी विजय चोरडिया यांनी व्हाईस ऑफ मिडीयाने अल्पावधीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांनी पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानत संघटनेची ध्येय धोरणे सांगुन आता पर्यंत केलेल्या कामाची माहीती दिली.यावेळी सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडीया जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी बाळासाहेब काळे,सुधीर बोर्डे, मारोती जुंबडे, राजन मंगरुळकर,सय्यद युसुफ,विष्णु सायगुंडे,शेख मुबारक, गजानन साबळे,रियाज कुरेशी,ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या फार्मसी विभाग प्रमुख सौ.अनिता अर्जुन नजन,ऑनलाईन विभाग प्रमुख प्रा.गिरीश गच्चे यांनी परिश्रम घेतले.यावेळी आनंद ढोणे,शेख अन्वर लिंबेकर,नारायण सोनटक्के,शिवाजी आकात यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केला.

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!