प्रजाशाहीचा आवाज : प्रतिनिधी सिद्धार्थ कुऱ्हे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 07 नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता तो दिवस भारत सरकार 2017 पासून विद्यार्थी दिन म्हणून साजरा करत असते त्या दिनाच्या औचित्य साधून भारतीय रिझर्व बँक यांच्या डी इ ए फंडा अंतर्गत चालू झालेल्या व क्रिशील फाउंडेशन यांच्या सहकार्याने चालू झालेल्या मनी वाईज वित्तीय साक्षरता केंद्र हिंगोली मार्फत मोजे दिग्रस कऱ्हाळे ता.जि. हिंगोली या गावातील नालंदा बौद्ध विहारात आर्थिक साक्षरता शिबिराच्या आयोजन केले होते या शिबिरामध्ये औंढा तालुका क्षेत्र समन्वयक करण कुऱ्हे यांनी आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणूक, बँक, बँकेशी संबंधित सर्व योजना, लोन व कर्ज तसेच विमा, पेन्शन या विषयांवर माहिती दिली सदर शिबिरामध्ये लहान मुलांना वही व पेन वाटपाचा कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते ,समगा गावचे सरपंच सिद्धार्थ इंगळे ,शाहीर शेषराव कुऱ्हे ,वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू मेसाजी कुऱ्हे ,सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बाबुराव कुऱ्हे अन्य गावकरी मंडळी उपस्थित होती सदर मनी वाईज वित्तीय साक्षरता सेंटर हे राजीव बोबडे ,देविदास शिंदे प्रीतम निनावे सत्यपाल चक्रे ,प्रभाकर शिंदे , सविता निपाणीकर व केंद्र व्यवस्थापक दिपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे





