तालुका प्रतिनिधी, बिलोली
अटकळी (ता. बिलोली) – आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिलोली तालुक्यातील अटकळी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी आणि चर्चा सुरू असताना, वंचित बहुजन आघाडीकडून अटकळी गणासाठी एक महत्त्वाचे नाव समोर आले आहे. अटकळी ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यमान सदस्या धुरपतबाई मारोती शेरे यांनी पंचायत समिती अटकळी गणातून उमेदवारीची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेत्याच्या मातोश्री:
धुरपतबाई शेरे या वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अमोल शेरे यांच्या मातोश्री आहेत. अमोल शेरे हे गेल्या काही वर्षांपासून महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना चांगला जनाधार लाभला आहे, ज्याचा फायदा धुरपतबाई शेरे यांच्या उमेदवारीला मिळू शकत





