कबनुर नगरीचे भावी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील घोणसे यांना पुत्ररत्न प्राप्ती, कबनुर गावी जल्लोषाचा माहौल

प्रतिनिधी – अमोल वाघमारे भेंडेगावकर (मुखेड – मुक्रामाबाद)
मुखेड तालुक्यातील कबनुर येथील रहिवासी व भावी सरपंच, कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते असलेले सतिष पाटील घोणसे यांना दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाला आहे. नवजात बाळ आणि आई, दोघेही पूर्णपणे सुखरूप आणि तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आनंददायी घटनेमुळे घोणसे कुटुंबामध्ये तसेच संपूर्ण कबनुर गावामध्ये व मित्रपरिवारामधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिवारातील सदस्य, नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थांकडून सतीश पाटील घोणसे व त्यांच्या पत्नीला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. तसेच नातेवाईक व मित्रपरिवाराने दूरध्वनी, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीतून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
प्रतिनिधी – अमोल वाघमारे भेंडेगावकर (मुखेड – मुक्रामाबाद





