प्रजाशाहीचा आवाज परिवारात पहिली बाईक दाखल
(विशेष प्रतिनिधी: साहेबराव काशिदे)
आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडिया परिवाराने एक नवीन आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. औंढा नागनाथ येथील रुद्र बजाज शोरूममध्ये 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची 125 सी.सी. इंजिन असलेली पल्सर बाईक खरेदी करण्यात आली. ही बाईक न्यूज मीडिया टीमच्या प्रवासात एक नवीन गती आणि ऊर्जा देणार आहे.या खास प्रसंगी, रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांच्या उपस्थितीत टीमचे संपादक वैभव धबडगे, प्रतिनिधी पत्रकार सिद्धार्थ कुऱ्हे, साहेबराव काशिदे, उत्तम गायकवाड आणि दिनेश खाडे हे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी मिळून नवीन बाईकचे स्वागत करत, आनंद व्यक्त केला.न्यूज मीडिया क्षेत्रात प्रजाशाहीचा आवाज एक स्वतंत्र आणि प्रभावशाली स्थान निर्माण करत आहे. बाईक खरेदीमुळे टीमचे काम अधिक वेगात आणि कार्यक्षमतेने होईल. ग्रामीण आणि शहरी भागात तत्काळ बातम्या, सामाजिक प्रश्न, महिलांचे मुद्दे, शैक्षणिक घडामोडी यांसारख्या विषयांचे कव्हरिंग आता आणखी जलद आणि सुलभ होईल.
संपादक वैभव धबडगे यांनी सांगितले, “टीममध्ये ही पहिली बाईक आल्यामुळे आमच्या पत्रकारितेला वेग, गुणवत्ता आणि एक वेगळा उमेद मिळेल. डिजिटल युगात लोकशाहीचा खरी आवाज पोहचवण्याची आमची क्षमता आता वाढणार आहे.”
रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी शुभेच्छा देताना प्रतित केला, “सामाजिक बदलासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी प्रजाशाहीचा आवाज सारख्या टीमची गरज असून, ही बाईक त्या कार्यात मदत करेल.”
लवकरच विशेष कव्हरिंग सुरू-
नवीन पल्सर बाईकच्या मदतीने अनेक ठिकाणी, माणसांपर्यंत, घडामोडींची बातमी अधिक वेगाने आणि शुद्ध माहितीने पोहोचवण्याची तयारी टीमकडून करण्यात येत आहे.ही सुरुवात म्हणजे डिजिटल पत्रकारितेचा यशस्वी प्रवास — आमच्या परिवाराला शुभेच्छा!





