लाडकी बहिणीला १५०० रुपयांवर समाधान; २१०० रुपयांची लाभरक्कम अद्याप मिळाली नाह

खामगांव प्रतिनिधी : ( दिनेश रावणकार ) खामगांव: दि.१३राज्यातील लाडक्या बहिणीसाठी नियोजित निवडणूक व इतर योजनांअंतर्गत २१०० रुपयांची ओवाळणी अद्याप १५०० रुपयांवर थांबलेली आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीतही संकट निर्माण झाले आहे. यावेळी बोगस कर्मचारी व बोगस लाभार्थी वगळण्यात आले, मात्र आता खरी गरज असलेल्या बहिणीच्या दारात संकट उभे राहिले आहे. या योजनेंतर्गत, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रुपये आहे, त्या बहिणीला लाभ मिळणार नाही, असे ठरले आहे. केवायसी प्रक्रियेसाठी अनेक अडचणी येत आहेत; मुदत वाढवूनही केवायसी करताना एरर दाखवला जात आहे. तांत्रिक अडचणीमुळे बहिणीला लाभ मिळविण्यास अडथळे येत आहेतबीयेत्या सणानिमित्त रक्षाबंधन, दिवाळी व भाऊबीज येऊनही बहिणीला २१०० रुपयांचा लाभ मिळालेला नाही. तर, आगनवाडी लाभार्थ्यांना भाऊबीज ओवाळणी मिळाली, मात्र इतर बहिणींना लाभ अद्याप मिळत नाही, असे स्थानिकांनी तक्रार केली आहे खामगांव येथील नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष देऊन लाडक्या बहिणीच्या लाभ वितरणात त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे.





