3.2 C
New York
Saturday, December 20, 2025

Buy now

spot_img

मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकार करावा: हर्षवर्धन सपकाळ

 

अप : यंदा २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असून, त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर हल्लाबोल केला. संघाने नथुरामचा विचार बाजूला ठेवावा, मनुस्मृतीची होळी करून संघ बरखास्त करून संविधानाचा स्वीकार करावा, अशी मागणी त्यांनी केली.मेडिकल चौक येथे काँग्रेस कमिटीच्या नागपूर पदवीधर मतदारसंघ दक्षिण नागपूर पदवीधर नोंदणी कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी सपकाळ पत्रकार परिषदेत बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रसन्ना तिडके, गुड्डू तिवारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसची विचारधारा संविधानावर, करुणा व समतेवर आधारित आहे. मात्र, संघाची विचारसरणी मनुस्मृतीतील भेदभाव, विषारी आणि विखारी प्रचारावर आधारलेली असल्याची टीका सपकाळ यांनी केली.भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या तत्त्वज्ञानाला नाकारणारेच मनुवादी होते. वारकरी संप्रदायाने ‘आपण सर्व एक आहोत’ हे तत्त्वज्ञान दिले. काँग्रेस त्याच तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या मार्गाने चालते, असे सपकाळ म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, उलट संघाने इंग्रजांची व्यवस्था मान्य केली होती, असा आरोपही त्यांनी केला.नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित नागपूर पदवीधर मतदार संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विचार व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. याप्रसंगी उपस्थित आ. विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रसन्ना तिडके.शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत व कर्जमाफी करा अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपकाळ आक्रमक झाले. काँग्रेस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. पण, सरकारने अद्याप मदत केली नाही.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ५ २ लाखांची मदत, कर्जमाफी जाहीर करून रब्बी पिकासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!