
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त व तसेच आंबेडकर चळवळीतील खंबीर नेतृत्व सर्वांच्या सुखदुःखात अग्रेसर असणारे आमचे नेते मा.रविंद्र भाऊ वाढे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 बावन खोली येथे भव्य दिव्य कार्यक्रम व बावन खोली येथील जि.प.प्रा.शाळा येथील विद्यार्थी यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शेख अतिखुर रहेमान , सामाजिक कार्यकर्ते सत्तार भाई तांबोळी व डॉ आसिफ पठाण यांच्या तर्फे वही पेन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बावन खोली येथील तरुण खाजा भाई तांबोळी, मोहम्मद भाई, अल्ताफ पठाण, अनिल कुरील, प्रल्हाद धाबे, दिपक केळे, नितीन धाबे, विशाल वाकडे,नितेश ओगले व बावन खोली येथील तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.





