नांदेड जिल्हा प्रतिनिधि:- नांदेड ग्रामीण भाजपच्या जिल्हा_उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने आज उमरी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील स्नेहीजण, हितचिंतक व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी उमरी येथील निवासस्थानी व पक्ष कार्यालयात तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेकांनी अभिनंदन केले! या सर्वांच्या शुभेच्छांचा मी नम्रपणे स्वीकार करतो.महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, खासदार अशोकरावजी चव्हाण, खासदार अजित गोपझडे साहेब,पालकमंत्री मा. श्री. अतुलजी सावे साहेब,भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकरावजी हंबर्डे, आमदार श्री. राजेशजी पवार साहेब व सौ पुनमताई राजेशजी पवार यांच्या मार्गदर्शनात आणि सर्व भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते सहका-यांसह भाजपचे विचार व विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, हा विश्वास बापूसाहेब पाटील कौडगावकर यांनी दिला.





