
बेरुळा येथील निळ्या झेंड्यासाठी लॉन्ग मार्च व बिऱ्हाड आंदोलनाचा इशार
________________________________
बौद्ध समाजावर प्रशासनाच्या वतीने अन्याय होत असल्याबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत. नुकताच मौजे बेरुळा (ता. औंढा, जि. हिंगोली) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लावलेला आमचा ‘निळा झेंडा’ प्रशासनाने बळाचा वापर करून काढून टाकला. या प्रकारामुळे बौद्ध समाजाच्या भावना गंभीररीत्या दुखावल्या आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जशी राम जन्मभूमी हिंदू समाजासाठी अस्मितेचा विषय आहे, तशीच ‘निळा झेंडा’ ही आमच्या अस्मितेशी व स्वाभिमानाशी जुळलेली बाब आहे. कोणत्याही लिखित तक्रारीशिवाय आणि केवळ काही राजकीय गटांच्या दबावाखाली प्रशासनाने ही कारवाई केल्याने आमच्यावर चुकीचा अन्याय होत आहे.
दि. ०५/०८/२०२५ रोजी औंढा नागनाथचे तहसीलदार, त्यांच्यासह पोलिस निरीक्षक व फौजफाटा गावात येऊन कारवाई करण्यात आली. त्यामुळे महिलांचा अपमान, समाजावरील दडपशाही आणि काही घरांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. महिलांनी केलेली कैफियतही प्रशासनाने दुर्लक्षिली.
जिल्ह्यात अनेक धर्माचे झेंडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सामाजिक बांधकाम विभागाच्या रस्त्यात व चौकात आहेत. औंढा तालुक्यातीलच शिरड शहापूर येथील 75 फूट उंच
–2–
झेंडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यात आहे. तो काढण्यासाठी 2022 पासून शिरडशहापूर येथील नागरिकांनी तक्रार करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला नाही. मग बेरुळा येथील बुलडोझर लावून झेंडा का काढला. शिरडशहापूर व इतर अनेक ठिकाणी असलेल्या झेंड्याचा रंग व धर्म वेगळा आणि बेरुळा येथील झेंड्याचा रंग व धर्म वेगळा असा काही भेदभाव प्रशासन करत आहे का?
भारतीय संविधानाच्या Article 14 नुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि कायद्याचे संरक्षण सर्वांना समान रीतीने मिळेल. तसेच Article 15 नुसार राज्य कोणत्याही नागरिकावर केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून कोणताही भेदभाव करणार नाही. असे असताना बेरुळा येथील बौद्धांवर प्रशासनाच्या वतीने अन्याय व भेदभाव का करण्यात आला. हे प्रशासनाचे कृत्य भारतीय संविधान Article 14 व 15 चे उल्लंघन करणारे आहे.
आमच्या प्रमुख मागण्या:-
1. निळा झेंडा तत्काळ त्या जागी सन्मानपूर्वक पूर्ववत लावावा, यासाठी प्रशासनास स्पष्ट निर्देश द्यावेत.
2. संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी आणि दोषींवर अधिकार , कर्मचारी व पोलिस बीट जमादार संदीप टाक वर ऑट्रोसीटी ॲक्ट नुसार कायदेशीर कार्यवाही करावी.
3. औंढा नागनाथचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व संबंधितांची CDR (Call Data Record) तपासणी करण्यात यावी. व त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. बेरुळा येथील बौद्ध समाजावर प्रशासनाकडू अनुसूचित जाती वर अन्याय झाला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 व 15 चे प्रशासनाकडून उल्लंघन झाले आहे. त्यानुसार दोषी पोलिस व इतर कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
5. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बेरुळा येथे निळा झेंडा चार वर्षे पूर्वी 14 एप्रिल 2021 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लावण्यात आला होता. सदर चौकाची जागा 70 फूट × 80 फुट आहे. या जागेची नोंद करुन या ठिकाणी निळा झेंडा व भारतीय संविधानाची प्रतिकृती लावण्याची परवानगी देण्यात यावी.
वरील मुद्द्यावर आम्ही बेरुळा येथील बौद्ध बांधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते आमचे लेकरं-बाळं, म्हातारी माणसे आणि सर्व साहित्य घेऊन बेरुळा गावापासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पैदल यात्रा करुन बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत.
करिता आपल्या माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.
–3–
* *लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनाची रुपरेशा खालील प्रमाणे*
सदर लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनात बेरूळा येथील सर्व बौध्द समाजातील व्यक्ती व आंबेडकर चळवळीतील नेते व कार्यकर्ते सहभागी असतील. त्यांच्या सोबत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा , भारतीय संविधानाची प्रत, निळे व पंचशील झेंडे आंदोलकांच्या हातात असतील.
आंदोलनाचा दिनांक :- 06/09/2025 रोजी वेळ सकाळी ठिक 10.00 वाजता पासुन मौजे बेरूळा येथून आंदोलनाची सुरूवात होईल.
लाँग मार्च चा मार्ग :- बेरुळा गांव – पेरजाबाद – अनखळी पोटा – साळणा – माथा – गोळेगांव – औंढा नागनाथ – यहळेगांव – हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय
• लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनाचा मुक्काम –
पहिला मुक्काम – दिनांक 06/09/2025 माथा ता.औंढा (ना) जि.हिंगोली
दुसरा मुक्काम – दिनांक 07/09/2025 बोरजा फाटा ता.औंढा (ना) जि.हिंगोली
तिसरा मुक्काम –दिनांक 08/09/2025 हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनात सहभागी आंदोलक लहान थोर व्यक्ती व महिलांचे संरक्षण करिता पोलिस व आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात यावी.निवेदनावर दिक्षानंद साहेबराव साळवे.प्रमोद अशोक कुलदीपके(जिल्हाध्यक्ष : भिमशक्ती हिंगोली दिनेश मारोतराव हनुमंते (रिपब्लिकन नेते
राहुल सिद्धार्थ घोडके जयदिप वंसतराव दिपके
(रिपब्लिकन कार्यकर्ते) (एन.डी.एम.जे.मराठवाडा अध्यक्ष) सुनिल कचरू दीपके संतोष आश्रोबा सोनवणे संदिप सुदाम घोडके आधी जणांच्या स्वाक्षरी आहेत





