
राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस पदी प्रकाश गव्हाणे
विशेष प्रतिनिधी:प्रकाश मगरे
वसमत : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बी.डी.बांगर यांनी पक्ष वाढीवर भर दिली असून, अनेकजन राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. वसमत विधानसभेचे आमदार राजू भैय्या नवघरे यांचे धडाकेबाज विकास कामे आणि अजित पवार यांचे नेतृत्व याकडे पाहून जिल्ह्यातील राजकीय वातावरण अनुकूल झाले आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी पक्ष प्रवेश करत आहेत. प्रकाश गव्हाणे यांनी देखील राजकीय महत्त्वाकांक्षा समोर ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष बी.डी.बांगर यांनी नियुक्ती पत्र द्वारा वसमत येथील युवा नेते प्रकाश गव्हाणे यांची हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी चे माजी तालुकाध्यक्ष असलेले प्रकाश गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच वसमत चे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज 04 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली. यानिवडी बद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वसमत चे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि सिद्धार्थ खंडागळे, नागेश दातार, विकास मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.





