3.2 C
New York
Saturday, December 20, 2025

Buy now

spot_img

निलंबित पोलिस निरीक्षक घोरबांडचा इतिहास काळाबांड?  

#घोरबांड_चा_इतिहास_काळाबांड इतिहास

          परभणी येथील 11 डिसेंबर 2024 ची संविधान प्रतिकृती ची विटंबना या घटने पासून ते 30 जुलै 2025 रोजी आलेला सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाला पर्यंत च्या या साडेसात महिन्यात अशोक घोरबांड हे नांव महाराष्ट्राच्या जनतेने अनेक वेळा ऐकले आहे. हा अशोक घोरबांड फार जातियवादी आणि गुन्हेगारी वृत्ती चा मुजोर पोलिस अधिकारी आहे. याने अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या इशाऱ्या नुसार आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. परभणी ची संविधान प्रतिकृती विटंबना ही घटना व्यवस्थीत न हाताळता संभ्रम निर्माण करुन लोकभावना भडकावू देण्याचा प्रयत्न या घोरबांड ने केला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला देखील हा घोरबांड जबाबदार आहे. त्यामुळे हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी बनला पाहिजे. 

 #जेथे_जाईल_तेथे_पदाचा_दुरुपयोग : 

 #अक्षय_भालेराव : हा घोरबांड जेथे जाईल तेथे काही ना काही कांड करणार म्हणजे करणार हे सर्वांना माहीत झाले आहे. यापूर्वी नांदेड मध्ये असताना बोंढार भिमजयंती च्या वादातून जातियवादी गिधाडांनी अक्षय भालेराव या तरुण मुलाचा खून केला. धारदार शस्त्राने पोटातील कोथळा बाहेर काढला यव्हढा भयानक प्रकार जेंव्हा घडला तेंव्हा घोरबांड हाच पोलिस निरीक्षक होता. त्याप्रकरणात आरोपिंना वाचवण्यासाठी त्याने पदाचा दुरुपयोग केला. 

#गोळीबार_करुन_गुंडा_येथील_दोन_तरुण_ठार_केले : हिंगोली जिल्ह्यातील गुंडा ता.वसमत या गांवचे काही तरुण मुले बाराशिव या गावा जवळ रस्त्याने जात असताना सिव्हिल ड्रेस वर व खाजगी गाडीने प्रवास करणाऱ्या अशोक घोरबांड या पोलिस निरीक्षकाने गोळ्या घालून त्यांना ठार केले. नंतर बनावट कथा रचून त्यातून स्वतः ची सुटका करून घेतली. यावेळी घोरबांड वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस स्टेशन ला पोलिस निरीक्षक होता.

#वसमत : वसमत येथे एका लाँज वर महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत पत्रकारांनी अशोक घोरबांड ला फक्त अंतर्वस्त्रावर (चड्डी) पकडले होते.

#हिंगोल : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला. पोलिस अधीक्षक च्या वरचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला.

#आखाडा_बाळापूर आणि इतरही काही पोलिस स्टेशन मध्ये असताना अशोक घोरबांड ने जात,पद, पैश्याची गुर्मी दाखवली

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!