30 जुलै/हदगांव
(गौतम खिल्लारे: विशेष प्रतिनिधी)
भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी पोलीस स्टेशन हदगाव (जि.नांदेड) येथे मिलींद एकबोटे व त्यांच्या सहकार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दखला करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सदर वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाची अमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन झाली आहे. आपले संविधान देशातील प्रत्येक धर्म, जातीच्या मानसांना हक्क व संरक्षण, अभिव्यक्ती, अधिकार इत्यादी देते. आज रोजी संविधानास 75 वर्षे झाले, असुन आजही आपल्या देशातील जवळपास 10 धर्म 7500 जाती शेकडा प्रथा परंपरा, भाषा, प्रांत,यांना एकसंघ जोडण्याचे काम आपल्या भारतीय संविधानाने केलेले आहे. असे चित्र जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. पण काही अर्बन मनुवादी विचारांचे लोक या देशात मनुस्मृती लागु करण्यासाठी भारतीय संविधानास बदनाम करण्यासाठी गोबेल्स नितीचा वापर करत आहेत त्याचाच भाग म्हणुन अँड. शिवाजी कोकणे शिवाजी नगर पुणे. लिखित संविधान का बदलावे हे पुस्तक त्यांनी भारतीय संविधाना बद्दल गैरसमज व संविधानाची बदनामी व मनुस्मृतीच महत्व वाढविण्यासाठी लिहीले आहे. अँड. शिवाजी कोकणे यांच्या संविधान विरोधी कृत्याला प्रोत्साहन म्हणुन मिलींद एकबोटे (कार्याध्यक्ष समस्त हिंदु आघाडी) सचिनदादा पाटील ( व्यवस्थापक युटुबर प्रसिद्ध लेखक व व्याख्याता), श्री. बाळासाहेब जमादार माळवदकर जयस्तंब कोरेगाव भिमा) बालचंद्र कुलकर्णी “मासिक) संजय विठ्ठल जढर (संपादक “आम्ही सारे (ब्राम्हण (पुणे जिल्हा प्रमुख) श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान, श्री. पराशर मोने- (श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व्याख्याते पुणे.) अॅड. रोषन माळवदकर (सुप्रसिद्ध लेखक) व सौ.सविता कुरुंदवाडे- (सुप्रसिद्ध लेखिका) वरील सर्व आरोपी संविधान का बदलावे या पुस्तकाचा आधार घेवुन संविधानास बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वरील पुस्तकावर तात्काळ बंदी घालुन वरील सर्व आरोपीवर देशद्रोह व संविधान अपमान अधिनियम नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. सदर निवेदनावर दादासाहेब शेळके,राष्ट्रपाल सावतकर,विशाल भालेराव ,रवी वाघमारे यांच्या स्वाक्षरी आहेत.





