महाराष्ट्र राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या संकल्प निरोगी महाराष्ट्राचा या पुस्तकाचे विमोचन आज करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनकल्याणाचे ध्येय समोर ठेऊन आरोग्य हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री मा. प्रकाशजी अबीटकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाचे कार्य अधिक गतिमान, पारदर्शक व सुदृढ बनवण्यासाठी कार्य करण्यात येत आहे. जनतेची कामे, आरोग्याशी निगडित जनहिताचे निर्णय प्रलंबित न ठेवता जनसेवेसाठी तत्परतेने राबवले जातात. या संबंधित योजना व निर्णयांची माहिती सर्वसामान्य जनतेला असावी या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ही महितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ कैलास बाविस्कर सर, आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते आज या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.





