2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

डोलारा ग्रामपंचायतचा भोंगळा कारभार !

आज दिनांक 28 रोजी लोहा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांना डोलारा ग्रामपंचायत येथे नागरिकांनी निवेदन दिले सरपंच शामगिरी ग्रामसेवक मधुकर मोरे ग्रामपंचायत सेवक नारायण गिरी यांनी गावातील सामान्य जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देतो रमाई आवास योजनेतील घर देतो म्हणून प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपये घेतलेले आहेत आणि रोजगार सेवक संजय गणपती वाघमारे यांनी देखील गावातील नागरिकांना वेगवेगळ्या योजना देतो म्हणून प्रत्येक योजनेसाठी त्याचा भाव ठरलेला आहे त्याने शेततळ्याच्या दहा हजार विहिरीसाठी 25000 असे जवळपास गावातील 70 टक्के लोकांकडून त्यांनी पैसे उकळण्याचे काम केले आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व तेथील पदाधिकारी यांना त्रस्त होऊन आज गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आणि रोजगार सेवक संजय गणपती वाघमारे ग्रामसेवक मधुकर मोरे व ग्रामपंचायत सेवक नारायण गिरी यांच्या हकालपट्टी करा अशी निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली असता यावेळी निवेदनावर सह्या करणारे प्रकाश तारू, मिथुन वाघमारे,दिगंबर जोगदळे, संदीप बेटकर, मारुती पवळे इत्यादी उपस्थित होते

spot_img

Related Articles

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा कुरुंदवाडी | प्रतिनिधी : संदीप इंगोले आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडी येथे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यातील...

उड्डाणपूल की निधी उडवण्याची योजना? MMRDA वर गंभीर आरोप विकासाच्या नावाखाली 100 कोटींचा अपव्यय?

100 कोटींचा उड्डाणपूल की MMRDA चा उडता विनोद? मीरा-भाईंदरमध्ये चारपदरी पूल अचानक दोनपदरी; ‘विकास’ की थेट निधीची लूट? मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी भोपाळमधील 90 अंश वळणाच्या पुलाने...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!