0.3 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

spot_img

तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी

तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी

• विधानसभा मतमोजणी केंद्र निश्चित
• विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

हिंगोली, दि.21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रती मतदार संघ 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकासाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

*विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्र*

92-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी रोड वसमत ता. वसमत जि. हिंगोली येथे होणार आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी जि. हिंगोली येथे होणार आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, एमआयडीसी, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी 1023 मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

*विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती*

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

कन्नडमध्ये खाकी वर्दीच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ; मार्गदर्शक अंकुश चव्हाण सरांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला उत्साह

  कन्नड (प्रतिनिधी): संदीप अळीग  तालुक्यातील तरुणाईला पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये यशाचे शिखर गाठून देण्यात मोलाचे योगदान देणारे प्रेरणास्थान, श्री. अंकुश चव्हाण सर यांच्या प्रमुख...

कन्नड तालुक्यातील पोलीस भरती व सैन्य भरतीमध्ये असंख्य मुलांचे करिअर यशस्वीपणे घडवणारे, मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. अंकुश चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा..

आपले ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपले कार्य असेच समाजाला दिशा देत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!