डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आदरणीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब हे 34 वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत या मतदार संघामध्ये सर्व बौद्ध समाजाचा त्यांना अगोदरपासूनच पाठिंबा आहे आता त्याच बरोबर मुस्लिम समाजाचे मोठे धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांच्याकडून सुद्धा सर्व मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांना आहे .अशा प्रकारचा संदेश त्यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना दिलेला आहे आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब वाशीम मंगरूळपीर मतदार संघातून मोठ्या फरकाने निवडून येणार अशा प्रकारचं वातावरण वाशिम मंगळरुपिर विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे बौद्ध समाज त्याचबरोबर मराठा, कुणबी समाज यांचा सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा राजरत्न आंबेडकर साहेब यांना अगोदरच देण्यात आलेला आहे त्याचबरोबर बंजारा समुदायाच्या शिष्टमंडळाने सुद्धा राजरत्न आंबेडकर यांना मतदान देऊन सहकार्य करणार अशा प्रकारची भावना मराठा समाजामध्ये कुणबी समाजामध्ये दिसून येत आहे त्यामुळे राजरत्न आंबेडकर यांच्या माध्यमातून एक प्रकार आंबेडकरवादी युवा आणि अभ्यास चेहरा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाशिम मतदार संघातून निवडून जाईल यावरती शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.





