18.1 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img

रेल्वे डब्यात प्रवासी महिलेची प्रसूती : डॉक्टर बनले देवदूत, बाळ-बाळंतीण सुखरूप

रेल्वे डब्यात प्रवासी महिलेची प्रसूती : डॉक्टर बनले देवदूत, बाळ-बाळंतीण सुखरूप
पूर्णा (प्रतिनिधी): डॉक्टर हे देवाचे रूप मानले जाते, याची प्रचिती पूर्णा रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेतून पुन्हा आली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या राजस्थानमधील एका गर्भवती महिलेची प्रसूती चक्क रेल्वेच्या डब्यात झाली. या वेळी रेल्वे दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल करवंदे यांनी तत्परतेने मदत करत सुखरूप बाळंतपण केले.शुक्रवारी सकाळी साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास भगतकीकोठी-पूर्णा गाडी पूर्णा स्थानकात दाखल होत असताना या गाडीतील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती लक्षात येताच गाडी स्थानकावर थांबवून रेल्वे दवाखान्याचे अधिकारी डॉ. करवंदे यांना तातडीने बोलावण्यात आले.
डॉ. करवंदे यांनी महिलेला तपासले असता प्रसूती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेला हॉस्पिटलमध्ये हलविण्याइतका वेळ नसल्याने डब्ब्यातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नातेवाईकांची परवानगी घेऊन काही मिनिटांत डब्बा रिकामा करून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर डॉ. करवंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षितरीत्या प्रसूती पूर्ण केली. काही वेळातच त्या महिलेला कन्यारत्न झाले.
बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती सध्या उत्तम असून त्यांना नातेवाईकांकडे सुखरूप सोपविण्यात आले आहे. डॉ. कपिल करवंदे यांच्या वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे मोठा अनर्थ टळला. या मानवतावादी कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 

 

 

Maharashtra Government

Health

spot_img

Related Articles

जिंतूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडणार

जिंतूर (प्रतिनिधी): सागर पुंडगे  स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम राखत जिंतूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६...

काय तर म्हणे बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, तरीही केंद्र सरकार बांगलादेशला ५ हजार टन डिझेल देणार “हे कसले हिंदुत्व?” — सोशल मीडियावर सरकारवर जहरी टीका 

  नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी    जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!